हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पांढरी कार, फुटलेली काच आणि थरारक पाठलाग-शिरपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी

सातारा जिल्ह्यात सराफा कुरियरवर दरोडा टाकून 22 तोळे सोने लुटून पळालेल्या पाच दरोडेखोरांना शिरपूर शहर पोलिसांनी थरारक पाठलाग करून अटक केली आहे.अभिषेक सुरेंद्र शिकलबार वय 19,अंकुश जाट वय 19,अनुज रामाधर दिवाकर वय 19,,पंकज केदार राठोड वय 19 अजय फौजदा राठोड वय 21 सर्व रा. गोलेगा मंदिर, ग्वाल्हेर, मध्यप्रदेश या संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दि. 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास न्यू लक्ष्मी कुरियर कंपनीचे मालक प्रमोद परमार आणि कुरियर बॉय कोमल परिहार हे सातारा शहराकडून मुंबई–पुणे दिशेने 22 तोळे सोन्याचे कुरियर घेऊन ऍक्टिवा मोटारसायकलवर जात असताना, पाच अज्ञात इसमांनी त्यांच्यावर दरोडा टाकत सोन्याची लूट केल्याची घटना साताऱ्यात घडली.संशयीत दरोडेखोर पांढऱ्या रंगाच्या कारमधून घटनास्थळावरून पसार झाले होते.याबाबत संशयीत पांढऱ्या रंगाच्या विना नंबरच्या स्विफ्ट कारने वेगाने मध्यप्रदेशच्या दिशेने धुळे मार्गे जात असल्याची माहिती सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना दिली.पोलीस अधीक्षक यांनी पोलिसांना महामार्गावर सापळा लावण्याचे आदेशीत केले.सदर माहिती शहर पोलिसांना मिळताच तात्काळ महामार्गावर टोल नाका परिसरात सापळा रचला.मात्र तोल नका चुकवून संशयितांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला असता शिरपूर शहर पोलिसांनी पाठलाग करून संशयितांना ताब्यात घेत संपूर्ण लुटलेले सोने व कार जप्त केली. या यशस्वी कारवाईमुळे सातारा आणि धुळे जिल्ह्यातील सराफा व्यावसायिकांनी सुटकेचा श्वास घेतला असून शिरपूर शहर पोलीस ठाणे च्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी,पीएसआय संदिप दरवडे, पोहेकॉ राजेंद्र रोकडे,रविंद्र आखडमल, पोकॉ योगेश दाभाडे,विनोद आखडमल, गोविंद कोळी,भटू साळुंखे,मनोज दाभाडे,प्रशांत पवार,मनोज महाजन, सचीन वाघ,विजय पाटील आदींनी केली

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!