हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर आदिवासी कोळी जमातीचा विराट मोर्चा

मुंबई/धुळे : राज्यातील विविध आदिवासी समाजांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात न्याय व हक्कांच्या मागणीसाठी २३ फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात समस्त महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त आदिवासी कोळी, ढोर/टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, डोंगर कोळी आदी जमातींच्या बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.उन्हाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्या, हक्कांचे संरक्षण, आरक्षण व विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यात आले. “चलो मुंबई… चलो मुंबई” या घोषणेसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या कार्यकर्त्यांनी आझाद मैदान परिसर दुमदुमून टाकला.
मोर्चादरम्यान जय आदिवासी, जय वाल्मिकी, जय राघोजी, जय तानाजी, जय झलकारी, जय संविधान अशा घोषणांनी परिसर भारावून गेला. धुळे जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातूनही मोठ्या संख्येने समाजबांधव या आंदोलनात सहभागी झाले होते.
या विराट मोर्चाच्या माध्यमातून शासनाने आदिवासी समाजाच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!