हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

राजबर्डी–धडगाव रस्त्यावर अवैध सागवान वाहतुकीवर वनविभागाची धडक कारवाई

धडगाव : राजबर्डी–धडगाव डांबरी रस्त्यावर रात्रीच्या गस्तीदरम्यान वनविभागाने अवैध सागवान वाहतुकीवर मोठी कारवाई करत वाहनासह २ लाख ८४ हजार ५३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे सुमारे ४ वाजता करण्यात आली.
अक्राणी व बिलगाव रेंजच्या वनकर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे गस्त घालत असताना शेलकुई गावाजवळ महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची मॅक्स पिकअप (क्रमांक एम.एच.०४ बी.यू. ४७६५) अडवली. तपासणीदरम्यान वाहनात सागवानाच्या ३० दांड्या आढळून आल्या. या सागवानाची किंमत २४ हजार ५३६ रुपये असून वाहनाची अंदाजे किंमत २ लाख ६० हजार रुपये आहे. एकूण २ लाख ८४ हजार ५३६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर वाहन धडगावकडे अवैधरित्या सागवान वाहतूक करत असताना आढळून आले. मात्र वाहन चालकाने अंधाराचा फायदा घेत वाहन जागेवर सोडून पलायन केले. त्याचा शोध घेण्यात आला, मात्र तो मिळून आला नाही. जप्त वाहन व मुद्देमाल पहाटे धडगाव टिंबर डेपोवर पावतीने जमा करण्यात आला.
या प्रकरणी वनरक्षक रोहिदास पावरा यांनी तक्रार दाखल केल्याने भा.व.अ. १९२७ च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास धडगावचे वनपाल दिलीप पाटोळे करीत आहेत.

ही कारवाई धुळे वनविभागच्या वनसंरक्षक श्रीमती निनु सोमराज, नंदुरबार वनविभागचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते, धुळे विभागीय दक्षता विभागाचे वनाधिकारी राजेंद्र सदगीर व आक्राणीचे सहाय्यक वनसंरक्षक नजय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वनक्षेत्रपाल चारुशीला काटे व बिलगाव वनक्षेत्रपाल यांच्या नेतृत्वाखाली वनपाल दिलीप पाटोळे, भरतसिंग परदेशी, वनरक्षक मंगेश वळवी, अशोक पावरा, पवन पाडवी, रोहिदास पावरा, दिलवरसिंग पावरा, गिरधर पावरा, दिनेश वसावे तसेच वाहनचालक हेमंत पावरा यांनी ही कारवाई यशस्वी केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!