शिरपूर : आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या फुटबॉल खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी बजावली.वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) मुंबई द्वारे आयोजित आंतर जिल्हा राज्यस्तरीय १३ वर्षांखालील मुलांची फुटबॉल स्पर्धा १२ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान नांदेड (धर्माबाद) येथे आयोजित करण्यात आली होती. धुळे जिल्ह्याच्या संघाने या स्पर्धेत सहभाग घेतला. धुळे जिल्ह्याच्या फुटबॉल संघात शिरपूर एज्युकेशन सोसायटी संस्थेतील १० विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या स्पर्धेत खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.यात मुकेश आर.पटेल इंग्लिश मीडियम स्कूल शिरपूरचे खेळाडू कृष्णा सुरेश भामरे, दर्शन अर्जुन फुलपगारे, जतिन जयेश बोरसे, लवकित प्रवीण पाटील, ओमकार ललित शर्मा, आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूरचे अजिंक्य जगदीश पावरा, विराट हेमंत सोनवणे, आर. सी. पटेल इंग्रजी माध्यमिक विद्यालय शिरपूरचे वेदांत ज्ञानेश्वर गिरासे, मृणाल अमोल पाटील, आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय खर्दे बु. चा खेळाडू भूषण सूर्याजी पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली.रत्नागिरी व लातूर येथील संघांसोबत धुळे जिल्ह्याच्या संघाने विजय मिळवला. परंतु मुंबई येथील संघाने उपांत्यपूर्व फेरीत धुळे जिल्ह्याच्या संघाचा पराभव केला.शिरपूर एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, धुळे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव रेषा पटेल, विश्वस्त अतुल भंडारी, विश्वस्त विजय भंडारी, सर्व संचालक, सीईओ डॉ. उमेश शर्मा, स्पोर्ट्स चेअरमन प्रितेश पटेल, अकॅडमिक इनचार्ज पी. व्ही. पाटील, जिल्हा फुटबॉल असोसिएशन सचिव संजय चौधरी, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सदस्य दिपक पाटील, एस.व्ही.के.एम. संस्थेचे स्पोर्ट्स डायरेक्टर डॉ. किरण अंचन, डॉ. विनय पवार, मुख्याध्यापिका स्मिता पंचभाई, मुख्याध्यापक प्रदीप साळुंखे, मुख्याध्यापक अमोल परब, मुख्याध्यापक प्रदीप पाटील, क्रीडा समन्वयक जे.पी.पाटील, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षकांनी संघातील खेळाडूंचे कौतुक केले.या संघाला फुटबॉल प्रशिक्षक मोहम्मद शफीक, अयाज अहमद, रवींद्र ठाकूर, अशोक माने यांचे मार्गदर्शन लाभले.