शिरपूर : शिरपूर येथील संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे रविवारी 22 फेब्रुवारी रोजी अरुणावती नदी परिसरात ‘प्रोजेक्ट अमृत’ अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी निरंकारी सेवकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
संपूर्ण धुळे झोन ३६-बी अंतर्गत हिरालाल पाटील (क्षेत्रीय प्रभारी धुळे झोन) यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या प्रोजेक्ट अमृत या सर्वव्यापी उपक्रमाच्या चौथ्या टप्प्यात शिरपूर शाखेच्या वतीने अरुणावती नदी परिसरातील बाह्य परीसरातील या ठिकाणी रविवारी सकाळी भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
‘
स्वच्छ जल स्वच्छ मन’ या संकल्पनेतून प्रेरित अभियानात मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून परिसर स्वच्छ करण्यात योगदान दिले.
सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या आशीर्वादाने आणि बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या जन्मदिवस निमित्त आयोजित या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संरक्षण बरोबरच समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे हा होता. सकाळी 8 ते 11 या वेळेत स्वयंसेवकांनी प्लास्टिक कचरा, साचलेली घान, इतर टाकाऊ वस्तु, गोळा करून संपूर्ण परिसर स्वच्छ केला.
या अभियानात शिरपूर शाखेचे मुखी गणेश पाटील, सेवादल संचालक जगदीश माळी, सेवादल रक्षक ज्ञानेश्वर माळी, महिला इन्चार्ज पल्लवी चौधरी, निरंकारी सेवादल व संगतचे सदस्य यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून स्वच्छता ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून आध्यात्मिक शिस्तीचा एक भाग आहे असा संदेश देण्यात आला. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनास चालना मिळत असून समाजात स्वच्छतेची सवय रुजण्यास मदत होत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
प्रोजेक्ट अमृत अंतर्गत देशभरात जलस्त्रोत, सार्वजनिक स्थळे व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या संकल्प करण्यात आला असून शिरपूर शाखेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत त्या ठिकाणी सेवेदार्यांना चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती.