हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बिजासन घाटात उलटलेल्या अपघातग्रस्त कंटेनरमधील चोरीसह 2 गुन्हे उघड; तिघे अटकेत,लाखोंचा मुद्देमाल जप्त,तालुका पोलिसांची कामगिरी

शिरपूर /- बिजासन घाट परिसरात अपघातग्रस्त अवस्थेत उलटलेल्या कंटेनरमधून दोन मोटारसायकलीं सह लाखों रुपयांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या तिघा संशयितांच्या मुसक्या आवळण्यात शिरपूर तालुका पोलीस ठाणे पोलिसांना यश आले आहे.तालुका पोलिसांनी तिघांना ताब्यात घेत एकूण १ लाख ९२ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून २ गुन्हे उघडकीस आणले आहेत. दिलीप शांतिलाल रावत व सुमित हिरालाल कौशल (दोघे रा. मालवन, ता. वरला, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) तसेच कृष्णा गुलाब पावरा (रा. पळासनेर, ता. शिरपूर) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

 

राजस्थानमधील निमराणा येथून तामिळनाडूतील धरमपुरीकडे हिरो कंपनीच्या ५० मोटारसायकली घेऊन RJ-14-GH-0835 क्रमांकाचा कंटेनर मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गाने जात असताना १२ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास बिजासन घाटात दुचाकीस्वाराला वाचवताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि कंटेनर खड्यात आदळून उलटला.या अपघातात चालक राजू कुमार यादव (३५, रा. लसगरीपुरा, बिहार) गंभीर जखमी झाला. ड्युटीवरील पोलिसांनी त्याला तत्काळ शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.उपचारानंतर दुसऱ्या दिवशी चालक कंटेनरजवळ आला असता दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळले. तपासात कंटेनरमधून १ लाख १६ हजार रुपये किमतीच्या हिरो कंपनीच्या दोन नव्या मोटारसायकली, १७ हजार ५०० रुपयांच्या ३५ बॅटऱ्या, ३६ हजार रुपयांचे ३६ साइट ग्लास, ४ हजार रुपयांची ४० कव्हर्स, ८ हजार रुपयांच्या दोन कंटेनर बॅटऱ्या आणि १५ हजार रुपयांचे सहा रिंग टायर असा एकूण १ लाख ६४ हजार २८० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे १३ डिसेंबर रोजी उघडकीस आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, २१ फेब्रुवारी रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून तिघां संशयितांना ताब्यात घेण्यात आले.चौकशीत त्यांनी चोरीची कबुली देत पळासनेर येथील आणखी एका मोटारसायकल चोरीचीही माहिती दिली. दोन्ही गुन्ह्यांतील एकूण १ लाख ९२ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. संशयितांना न्यायालयात हजर केले असता २७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल शिरसाठ करीत आहेत.सदरची कारवाई जिल्हा पोलीस श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे,शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, पीएसआय मनोज कचरे, पोहोकॉ अनिल शिरसाठ, संतोष पाटील,संदिप ठाकरे,पोकॉ योगेश मोरे,विजय ढिवरे,वाला पुरोहीत चापोहेकॉ गिरधर पाटील आदींनी केली आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!