हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिवाजी महाराज इतिहासातील सर्वश्रेष्ठ राजा : प्रा. सतीश अहिरे

शिरपूर :- शिरपूर तालुक्यातील नवीन आढे येथे अक्षल फाउंडेशन, धुळे यांच्या वतीने ३९७ व्या शिवजयंतीनिमित्त शिवचरित्र व्याख्यानाचा कार्यक्रम बसस्थानक परिसरात उत्साहात झाला.कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराणा प्रताप, महात्मा फुले, वीर एकलव्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. धुळे येथील शाहीर मनोज नगराळे, हर्ष मोरे व राज पगारे यांच्या शाहीर व गीतांनी वातावरण भारावून गेले.
धुळे येथील व्याख्याते प्रा. सतीश अहिरे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकताना, हिंदवी स्वराज्य उभारताना जात, धर्म, पंथ यांचा भेद न करता सर्व समाजघटकांना एकत्र घेऊन त्यांनी मुघल सत्तेशी संघर्ष केला, असे सांगितले. परस्त्रीला माता मानण्याची शिकवण, माता जिजाऊंच्या संस्कारांतून घडलेले व्यक्तिमत्त्व आणि दूरदृष्टीमुळे शिवाजी महाराज हे इतिहासातील सर्वश्रेष्ठ राजा असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस पाटील राजकिरण राजपूत होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपसरपंच योगेश पाटील, विकास सोसायटीचे चेअरमन दगडू पाटील, अक्षल फाउंडेशनचे अध्यक्ष अँड. अमोल शिरसाठ, तंटामुक्ती अध्यक्ष चंद्रसिंग गिरासे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड.अमोल शिरसाठ यांनी केले. सूत्रसंचालन महेंद्र शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन योगेश पाटील यांनी केले. मान्यवरांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. पंचशील मित्र मंडळ, शिवबा मित्र मंडळ आणि अक्षल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!