हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तालुक्यातुन गांजाची बस मधून तस्करी,मुंबईच्या युवकाला १० किलो गांजासह ताब्यात,थाळनेर पोलिसांनी कारवाई

शिरपूर (प्रतिनिधी) तालुक्यातून मुंबईकडे जाणाऱ्या युवकाला शिरपूर-चोपडा रस्त्यावरील सावेरजवळ बसमधून ८६ हजार ३२० रुपये किमतीचा १० किलो सुका गांजासह ताब्यात घेण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.ही कारवाई थाळनेर पोलिसांनी गुरुवार, १९ फेब्रुवारी रोजी केली.थाळनेर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एपीआय हेमंत पाटील यांनी गोपनीय माहितीच्या आधारे या कारवाईचे नेतृत्व केले.
शिवजयंती निमित्त पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की,हिसाळेहून शिरपूरकडे जाणाऱ्या हिरव्या रंगाच्या महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या शिवाई ईलेक्ट्रिक बसमध्ये एक व्यक्ती गांजा वाहत आहे.पोलीसांनी बस सावेर गावाजवळ थांबवून तपासणी केली असता, मागील सीटवर बसलेला मुसाफिर मुस्तफा जिलानी शेख (वय ३६, रा. अंधेरी पश्चिम, मुंबई) या इसमाच्या सॅकबॅगमध्ये गांजा आढळून आला. तपासणी दरम्यान सॅकबॅगमध्ये खाकी रंगाचा चिकट टेप लावलेला पुडा सापडला,ज्यातून आंबट उग्र वास येत होता.सदर संशयीतास सॅकबॅगसह पोलिस स्टेशनवर आणून कारवाई करण्यात आली. या कारवाईत ८६,३२० रुपये किमतीचा १० किलो गांजासह संशयीताला ताब्यात घेतले आहे. थाळनेर पोलिसांनी संशयीताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे,अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक थाळनेर पो.स्टे प्रभारी हेमंत पाटील,पीएसआय समाधान भाटेवाल,पीएसआय हर्षल पाटील, पोहेकॉ दिनेश महाले,रावसाहेब पाटील,पोकॉ उमाकांत वाघ, अनिकेत साळुंखे,रविंद्र मोरे, रामकृष्ण बोरसे,चापोकॉ दिलीप मोरे अशांनी मिळून केली आहे

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!