शिरपूर : अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन तर्फे डायरेक्टर सौ. द्वेता करण नथवाणी यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत सातत्याने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून “मोतीबिंदू मुक्त शिरपूर” हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
या उपक्रम अंतर्गत अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या वतीने मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिराचे आयोजन दि. १४ फेब्रुवारी २०२६ रोजी जनक विला येथे करण्यात आले. या शिबिरात एकूण १२४ नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान तज्ज्ञ डॉक्टरांनी १०५ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान केले.
यापैकी पहिल्या टप्यात २५ रुग्णांना दि. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी तुलसी आय हॉस्पिटल, नाशिक येथे पाठविण्यात आले. संबंधित रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर ३० दिवसांनी मोफत चष्म्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.
अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशन तर्फे डायरेक्टर सौ. द्वेता करण नथवाणी यांच्या संकल्पनेतील या सामाजिक उपक्रमासाठी अस्तित्व सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या संचालिका सौ. कृतीबेन भूपेशभाई पटेल, फाउंडेशनच्या समन्वयक सौ. सोनिया भसीन, स्वीय सहाय्यक सुनील जैन, योगेश्वर माळी, अस्तित्व सोशल वेल्फेअर फाउंडेशनची संपूर्ण टीम उपस्थित होती.