हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

महामार्गावरील खड्डयात फुलहार घालत नागरिकांचा रस्ता दुरस्तीसाठी ठिय्या आंदोलन

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील तालुक्यातील हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्याच्या वळणावर दोन्ही बाजूस चार ते पाच फूट लांब आणि दोन तीन फुट खोल खड्डे मोठ्या प्रमाणावर पडले आहेत. त्याचा निषेध म्हणून सामाजिक कार्यकर्ते व नागरीकांनी रस्त्यातील खड्ड्यात फुलहार घालून प्रतीकात्मक पूजन करुन ठिय्या आंदोलन केले. प्रशासनाच्या आश्वासनानंतर नागरीकांनी आंदोलन मागे घेतले.

 

 

मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर असलेल्या परिवहन विभाग व एमबीसीपीएनएल कंपनीच्या हद्दीतील रत्यावर अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य पसरले आहे. खड्ड्यांमुळे अनेकवेळा लहान मोठे अपघात घडले आहेत. त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. खड्ड्यांची दुरस्ती करण्यात यावी, याबाबत संबंधीत कंपनी व परिवहन विभागाला वारंवार निवेदन दिले. मात्र, संबंधीत कंपनीच्या प्रशासनाने दखल घेतली नाही. लाखो रुपयांचा टोल आणि कर वसूल करणाऱ्या प्रशासनाला मात्र या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यास वेळ मिळत नसल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात होता.संतापलेल्या सामाजिक कार्यकर्ते राजेश सराफ, दिलीप कोळी, देवेंद्र यादव आदींनी रास्तारोको आंदोलन करुन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
महामार्गावर काहीकाळ वाहतूक कोडी झाल्याने सांगवी तालुका पोलिसांनी आंदोलनस्थळी येऊन नागरीकांनाची समजूत काढली. संबंधीत अधिकारी बीसीपी हेड विजय प्रभू, वाहतूक विभागाचे अधिकारी रवींद्र जाधव यांनी लवकरच रस्ता दुरस्ती करण्याचे आश्वासन दिले. वेळेत रस्त्याची दुरस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरीकांनी दिला.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!