हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

धुळ्यात एलसीबीकडून २४ तासांत दोन घरफोड्या उघड; दोन सराईत गुन्हेगार मुद्देमालासह जेरबंद

धुळे : शहरातील दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा अवघ्या २४ तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेने दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. संशयियांकडून सुमारे ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
धुळे शहरातील अभय कॉलेजजवळील रामनगर परिसरातील एका घरातून १४ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारीदरम्यान ४५ हजार ९५० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, इन्व्हर्टर व बॅटरी चोरीस गेल्याची घटना घडली होती.तसेच मनोहर टॉकीज मागील अमरनगर परिसरात १५ ते १७ फेब्रुवारीदरम्यान दुसरी घरफोडी होऊन सुमारे ९६ हजार रुपयांचे दागिने व रोकड लंपास करण्यात आली होती.या दोन्ही घरफोडी प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दोन्ही गुन्ह्यांची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे रहान उर्फ पोपण्या फरीद पठाण वय २० व शाहरुख शेख सलीम वय २०, दोन्ही रा.अंबिकानगर पत्रेवाली मशिद जवळ,धुळे यांना ताब्यात घेण्यात आले.चौकशी दरम्यान दोघांनीही घरफोडीची कबुली दिली.संशयीतांकडून सोन्या-चांदीचे दागिने,इन्व्हर्टर,बॅटरी तसेच मोटारसायकल असा एकूण ९० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास आझादनगर पोलीस करीत आहेत.धुळे एलसीबीने 24 तासाच्या आत गुन्ह्यांचा उलगडा झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!