हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर 60′ व मुकेशभाई पटेल सैनिकी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे जेईई मेन्स-1 परीक्षेत उल्लेखनीय यश ​

शिरपूर : श्री विलेपार्ले केळवणी मंडळ मुंबई संचालित तांडे येथील मुकेशभाई आर. पटेल  सैनिकी विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व ‘शिरपूर 60’ च्या विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स-1 परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

यावर्षी जेईई मेन्स-1 निकालात ‘शिरपूर 60’ मधील
विकेश बोदा पावरा (एस.टी.) याने  94.95 पर्सेंटाइल,
​मुकेश तेरसिंग पावरा (एस.टी.) 91.90 पर्सेंटाइल,
अमर विठ्ठल पावरा (एस.टी.) 58.85 पर्सेंटाइल
तसेच मुकेशभाई आर पटेल मुला-मुलींची सैनिकी शाळेतील मयंक राजेंद्र पानपाटील (एस.सी.) 68.23 पर्सेंटाइल, अनार्य रमेश वसावे (एस.टी.) याने 63.33 पर्सेंटाइल गुण प्राप्त करुन घवघवीत यश संपादन केले.
​श्री विलेपार्ले केळवणी मंडळ अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिरपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी उज्ज्वल भविष्य घडवावे यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलातील आदिवासी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण व स्पर्धेत उज्ज्वल भविष्य घडविता यावे यासाठी भाईंनी गेल्या अनेक वर्षांपासून “शिरपूर 60” हा उपक्रम सुरू केला. याच उपक्रमाचे फलित म्हणून विद्यार्थ्यांनी जेईई मेन्स परीक्षेत यश संपादन केले आहे. आदिवासी भागातील विद्यार्थी केवळ गरिबीमुळे किंवा मार्गदर्शनाअभावी मागे राहू नयेत, तर त्यांनी देशातील आयआयटी, एनआयटी, एम्स सारख्या नामांकित संस्थांमध्ये जाऊन जगाशी स्पर्धा करावी, हा अमरीशभाईंचा ध्यास आज प्रत्यक्षात सिद्ध होत आहे.
इयत्ता आठवीपासूनच विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना जेईई व नीट सारख्या परीक्षांसाठी तयार केले जाते. विशेष म्हणजे, यासाठी मुंबईसह इतर अनेक ठिकाणाहून नामवंत प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. घरची परिस्थिती हलाखीची असलेल्या या विद्यार्थ्यांना राहण्यापासून ते उच्च दर्जाच्या शिक्षणापर्यंत सर्व सोयीसुविधा भाईंनी उपलब्ध करुन दिल्या आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल, ट्रस्टी चिंतनभाई पटेल, व्यवस्थापन समिती सदस्य राजगोपाल भंडारी, डायरेक्टर गिरीजा मोहन, सीईओ डॉ. उमेश शर्मा, प्राचार्य दिनेशकुमार राणा यांनी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे मनापासून अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांना प्राचार्य दिनेशकुमार राणा, प्राध्यापक, आश्रमशाळांचे प्राचार्य, शिरपूर-60 चे शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!