हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बिजासन घाटात ब्रेकफेल ट्रकची भीषण धडक; सेफ्टी सुपरवायझर ठार

शिरपूर : राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील बिजासन घाट परिसरात सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. ब्रेकफेल झालेल्या ट्रकने प्रथम एका कंटेनरला धडक दिली. त्यानंतर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरवर ट्रक आदळला. या अपघातात रस्ता बांधकाम करणाऱ्या खासगी कंपनीतील सेफ्टी सुपरवायझरचा जागीच मृत्यू झाला.दुर्गेश कुमार (वय २२, रा. देवरिया, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी असून महिनाभरापूर्वीच संबंधित कंपनीत नोकरीला लागला होता. पाच बहिणींचा तो एकुलता एक भाऊ होता. पुढील महिन्यात त्याचा विवाह होणार होता, अशी माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक इंदूरहून चुरी भरून महाराष्ट्राकडे निघाला होता. बिजासन घाट उतरताना ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. ट्रकने आधी कंटेनरला धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याकडेला उभ्या असलेल्या डंपरवर जाऊन आदळला. संबंधित खासगी कंपनीकडून राष्ट्रीय महामार्गावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे. एका बाजूने डांबर टाकण्याचे काम सुरू असून दुसऱ्या बाजूने वाहतूक सुरू होती.
दुर्गेश हा सेफ्टी सुपरवायझर म्हणून कामाच्या देखरेखीकरिता रस्त्याकडेला उभा होता. ट्रक बेकाबू झाल्याचे लक्षात येताच कामगारांनी बाजूला होण्याचा इशारा दिला. बहुतांश कामगार सुरक्षित स्थळी गेले; मात्र दुर्गेश घाईत तोल जाऊन पडला. ट्रक व डंपरच्या धडकेत तो चिरडला जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच बिजासन चौकीचे पोलिस कर्मचारी तसेच महामार्ग कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. क्रेन व जेसीबीच्या साहाय्याने ट्रक हटवून मृतदेह बाहेर काढण्यात आला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक जप्त केला आहे.
दरम्यान, बिजासन घाटात सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली होती. या भागात वारंवार अपघात होत असल्याने घाटमार्ग अधिक सुरक्षित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!