हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

तालुक्यातील तरडी येथे महिलेचा विनयभंग; संशयितास पोलिसांसमोरच चोप,गुन्हा दाखल

शिरपूर : तालुक्यातील तरडी येथे एका परप्रांतीय तरुणाने स्थानिक ४० वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेनंतर गावात संतप्त पडसाद उमटले असून संशयिताला पोलिसांसमोरच जमावाने मारहाण केल्याचा प्रकारही घडला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत संशयीताला ताब्यात घेतले.
याप्रकरणी संबंधित महिलेने थाळनेर पोलीस ठाण्यात येथे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, शनिवारी रात्री ती आपल्या राहत्या घरी असताना बिरेंद्रकुमार रामधीन यादव (वय २७, रा. रूपपीखर, बिहार) हा जबरदस्तीने घरात घुसला.विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्याने महिलेबरोबर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला.महिलेने आरडाओरड केल्याने संशयिताने तेथून पळ काढला.
या प्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध विनयभंग तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तपासाची सूत्रे हातात घेत पोलिसांनी तरडी गावातून संशयिताला ताब्यात घेतले.
दरम्यान,गावात पुन्हा अशी घटना घडू नये, या मागणीसाठी महिलांनी एकत्र येत संशयिताला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली. पोलिसांच्या वाहनात बसविण्यात आलेल्या संशयितास काहींनी मारहाण करण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली. कायद्याने कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थ माघारी फिरले.
संशयित हा बिहार राज्यातील असून थाळनेर परिसरात मजुरीच्या कामासाठी आल्याची माहिती पोलिसांनी दिली.पुढील तपास थाळनेर पोलिसांकडून सुरू आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!