हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर येथे उद्योगपती चिंतनभाई पटेल क्रीडा महोत्सव अंतर्गत 21 फेब्रुवारी पासून डे-नाईट क्रिकेट स्पर्धांचे भव्य आयोजन

शिरपूर : उद्योगपती चिंतनभाई पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त चिंतनभाई पटेल क्रीडा महोत्सव अंतर्गत डे-नाईट क्रिकेट स्पर्धांचे 21 फेब्रुवारी पासून भव्य आयोजन करण्यात आले असून शिरपूर तालुक्यातील क्रिकेट संघांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष, श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई उपाध्यक्ष, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट उपाध्यक्ष तथा शिरपूर टेक्सटाईल पार्क कार्यकारी संचालक, उद्योगपती, युवा नेतृत्व चिंतनभाई पटेल क्रीडा महोत्सव -2026 क्रिकेटचा भव्य उद्घाटन सोहळा शिरपूर तालुक्यातील अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.
शिरपूर शहरातील भगवंत पार्क, स्वामीनारायण मंदिराजवळ मैदानावर चिंतनभाई युवा प्रतिष्ठान, शिरपूर तर्फे 21 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच 21 फेब्रुवारी पासून होणाऱ्या डे-नाईट क्रिकेट स्पर्धेसाठी अंतिम नाव नोंदणी 20 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5 वाजे पर्यंत विनोद ठाकरे (वैष्णवी डि.जे.) 9850444789, संदीप माळी 8275007568, संदीप कुंवर 8275590002, वसंत पावरा 9082862909 यांच्याकडे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उद्घाटनाच्या दिवशी दि. 21 फेब्रुवारी 2026 रोजी सांयकाळी 5 वाजता सहभागी क्रिकेट संघाने लॉट्स घेण्यासाठी उपस्थित रहावे.या क्रिकेट स्पर्धेत शिरपूर तालुक्यातील क्रिकेट संघांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे विजेत्या संघाला 1 लाख रुपयाचे पारितोषिक व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाच्या उपविजेत्या संघाला 71 हजार रुपये व ट्रॉफी तसेच तृतीय क्रमांकाच्या संघाला 50 हजार रुपये व ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!