शिरपूर : तालुक्यातील बभळाज येथील आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भूगोल प्रज्ञाशोध परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले.
संपूर्ण महाराष्ट्र राज्यात भूगोल प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत या शाळेतील ६० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. ५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कर्मजीत प्रविणसिंग राजपूत (१० वी ब) या विद्यार्थ्याने या प्रज्ञाशोध परीक्षेत सिल्वर मेडल पटकावले आहे.
मुख्याध्यापक आर.एल.तवर यांनी कर्मजीत राजपूत यास सिल्वर मेडल प्रदान केले. तसेच या भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेतील सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येऊन यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
या यशस्वी विद्यार्थ्यांना भूगोल शिक्षक बी.व्ही.मोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी आर.टी.पाटील, डी.सी बडगुजर, के.एल.पाटील, डी.ए.पावरा, बी.बी.लोहार, एस.जी.वाडीले, आर.आर.गोपाल, एस.एम.पाटील, एस.एस.पाटील, नंदकिशोर चौधरी, राहुल चौधरी, सौ.जे.एन.पाटील, सौ. शीतल पाटील उपस्थित होते.