शिरपूर : श्री नागेश्वर-अजनाड येथे श्री क्षेत्र नागेश्वर संस्थान तर्फे महाशिवरात्री निमित्त १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता सलग तिसऱ्या वर्षी १००८ श्री पार्थिव शिवपूजन सोहळा आयोजित करण्यात आला असून भविकांनी सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.

शिरपूर-चोपडा मार्गावरील अजनाड गावाजवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री नागेश्वर सेवा संस्थानतर्फे येत्या महाशिवरात्रीला श्री नागेश्वर सेवा संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या संकल्पनेतून शिवभक्तांसाठी १५ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ ते ७ वाजेपर्यंत महाशिवरात्रीचे औचित्य साधून श्री क्षेत्र नागेश्वरच्या भूमीत १००८ जोडप्याद्वारे शिवपूजन व मंत्रयुक्त रुद्राक्षांचे वाटप सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या शिव सोहळ्यात १००८ भाविक एकाच वेळी सहभागी होतील.तसेच भूपेशभाई पटेल व भार्गवभाई पटेल यांनी निर्मित केलेला मुंबई येथील द ग्रेट इंडियन क्वायर भक्तीमय संगीत संध्येचा श्रवणीय कार्यक्रम मुंबई येथील कलाकार प्रकाश वाडेकर सादर करणार आहेत. यावेळी भव्य दिव्य स्वरूपात गंगा आरती करण्यात येणार आहे. तसेच नादकृष्ण ढोल ताशा पथक व कृष्णकला डान्स अकॅडमी शिरपूर यांच्यावतीने शिवमहिमा चरित्रावर आधारित नृत्य व वादनाचे भव्य सादरीकरण करण्यात येणार आहे.
शिवपूजन सोहळा नागेश्वर मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. पार्थिव शिवपूजन हे व्रत, सर्वच मनोकामना पूर्ण करणारे आहे.या नयनरम्य शिव सोहळ्यात तसेच कार्यक्रमाला भूपेशभाई पटेल मुख्य यजमान असतील. तरी गावोगावी राहणाऱ्या सर्वच शिवभक्तांनी या शिवसोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पूजेत सहभागी होण्यासाठी 7972712720 यावर तसेच इतर माहिती साठी 9850636121, 8390816651 या नंबरला संपर्क करावा. पूजेची यादी लगेच व्हाटसअप ला पाठविण्यात येईल. पूजेसाठी रुपये २५१ सहयोग राशी आहे. पूजेला बसणारे व सोबतीला येणारे सगळ्यांची फराळाची व्यवस्था श्रीक्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान मंदीराकडूनच आहे. शिवपूजनाला विवाहित जोडपे, कुमारीका मुली, अविवाहित मुले, दुर्दैवाने वैधव्य आलेल्या माता, एकटा पुरुष, एकटी भगिनी, अशा सगळ्यांना पूजेला बसण्याचा अधिकार आहे. अट फक्त वय १२ वर्षे पेक्षा जास्त असावे. सहयोग राशी २५१ रु. भरून कुपन ताब्यात घ्यावे. पूजेसाठी एक तासाचा कालावधीच लागणार आहे. पूजेची वेळ सायंकाळी ६ ते ७ असेल. पूजेसाठी लागणारी मातीची शिवपिंड इथेच मिळेल तसेच प्रासादिक रुद्राक्ष मंदिराकडून मिळेल.
शिवमहिमा चरित्रावर आधारीत नृत्य व वादनाचे भव्य सादरीकरण करण्यात येणार आहे.
पुजेला बसलेल्या सर्वांना मंत्रयुक्त रुद्राक्षांचे वाटप जागेवरच केले जाईल. कार्यक्रमानंतर प्रसादाचे वाटप होईल व रात्री १२ वाजता मुख्य मंदिरात महाभिषेक होईल. पूजेचे मुख्य यजमान उद्योगपती भूपेशभाई पटेल असणार आहेत.
श्री नागेश्वर सेवा संस्थान कडे आपली नावे नोंदवावीत व शिवपूजन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री नागेश्वर सेवा संस्थानचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी केले आहे.