हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

महाराष्ट्र विधीमंडळाच्या नीती मूल्य समितीच्या सदस्यपदी आ.अमरिशभाई पटेल यांची निवड

धुळे/नंदुरबार : महाराष्ट्र विधीमंडळाच्या नीती मूल्य समितीच्या सदस्यपदी धुळे-नंदुरबार विधानपरिषद सदस्य आ. अमरिशभाई पटेल यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे.
आ.अमरीशभाई पटेल यांना सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभव असून विधानपरिषदेत ते विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण मांडणी करत असतात. त्यांच्या कार्यतत्परतेची दखल घेत त्यांची नीती मूल्य समितीवर नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे.
नीती मूल्य समिती ही विधीमंडळातील सदस्यांच्या आचारसंहितेचे पालन, नैतिक मूल्यांचे जतन व पारदर्शकतेच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावणारी समिती आहे. या समितीत निवड झाल्यामुळे धुळे-नंदुरबार जिल्ह्याचा गौरव वाढला असल्याची भावना व्यक्त होत आहे.
आ.अमरिशभाई पटेल यांच्या निवडीबद्दल विविध राजकीय, सामाजिक संघटना व नागरिकांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!