हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

अनुदान मंजुरीसाठी ५ हजारांची लाच पडली महागात,कृषी अधिकाऱ्यांसह डाटा ऑपरेटर एसीबीच्या ताब्यात

शिरपूर तालुका कृषी कार्यालयातील डाटा एन्ट्री ऑपरेटर सुनील धनराज पाटील (वय ३२) याला ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकरणी तालुका कृषी अधिकारी संजय हिम्मतराव पवार (वय ४३) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांचे शिरपूर तालुक्यातील बभळाज येथे शासनमान्य बी-बियाणे व खत विक्रीचे दुकान आहे. महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत गव्हाच्या बियाण्यांचे वितरण करण्यात येते. सन २०२५-२६ मध्ये ९० शेतकऱ्यांना विक्री केलेल्या गव्हाच्या बियाण्यांवरील सुमारे १ लाख ४० हजार रुपयांच्या अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे तक्रारदारांनी तालुका कृषी कार्यालयात सादर केली होती.सदर अनुदान प्रस्ताव मंजूर करून शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्यासाठी डाटा एन्ट्री ऑपरेटर सुनील पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांना ५ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगून लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदारांनी ११ फेब्रुवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे येथे केली होती.                                                                    सदर तक्रारीची पडताळणी करून १२ फेब्रुवारी रोजी सापळा रचण्यात आला. यावेळी सुनील पाटील यांनी तक्रारदारांकडून ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या लाच मागणीस तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी दुजोरा दिल्याचेही निष्पन्न झाले.या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरू होती                                                   धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक श्रीमती पद्मावती कलाल,यशवंत बोरसे,पोहेकॉ राजन कदम, मुकेश अहिरे,प्रविण मोरे,संतोष पावरा, पोकॉ.मकरंद पाटील, प्रशांत बागुल, प्रविण पाटील,प्रितेश चौधरी, मपोकॉ. रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे यांच्या पथकाने केली.कोणत्याही शासकीय/निमशासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी कामासाठी लाचेची मागणी केल्यास त्वरित धुळे एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना केले आहे

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!