शिरपूर : शिरपूर भाजपा तर्फे आमदार कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन करण्यात आले.शिरपूर आमदार कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता माल्यार्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
आमदार काशिराम दादा पावरा यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती देऊन मार्गदर्शन केले. पंडित दीनदयाल उपाध्याय जे एक प्रखर राष्ट्रवादी, विचारवंत, पत्रकार आणि भारतीय जनसंघाचे महान नेते होते. ज्यांनी भारतीय राजकारणाला ‘एकात्म मानववाद’ ही मूलगामी विचारधारा दिली. साधे जीवन व उच्च विचारसरणीचे समर्थक, दीनदयालजींनी समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करून राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग दाखविला, असेही ते म्हणाले.
माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम दादा पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष तथा नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, शिरपूर ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, थाळनेर मंडळ अध्यक्ष विरुपाल राजपूत यांच्या नियोजनातून शिरपूर आमदार कार्यालयात पंडित दीनदयाल उपाध्याय अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
Oplus_16908288
भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या राष्ट्रीय कार्यासह सविस्तर विवेचन केले.ॲड. बाबा पाटील यांनी दीनदयाल उपाध्याय यांचा जीवन परिचय सांगितला.यावेळी आमदार कार्यालयात भाजपा व्यापारी आघाडी तर्फे कैलासचंद्र अग्रवाल यांनी ‘केंद्रीय अर्थ संकल्प 2026 – प्रचार अभियान व व्यापारी आघाडी व्यावसायिक संवाद संमेलन’ बद्दल देखील माहिती देण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी आमदार काशिराम दादा पावरा, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती के. डी. पाटील, भाजपा अनु. जाती आघाडी जिल्हाध्यक्ष पिंटू शिरसाठ, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष कैलासचंद्र अग्रवाल, गोपाल भंडारी, मिलिंद पाटील, शिक्षण सभापती शामकांत ईशी, प्रेमचंद शिरसाठ, बाबुलाल महाजन, रोहित रंधे, राज सिसोदिया, पिंटू माळी, इरफान मिर्झा, रज्जाक कुरेशी, भालेराव माळी, पंडित पाटील, कमलेश सोनार, भाजपा पदाधिकारी नरेंद्र पाटील, योगेंद्रसिंग सिसोदिया, संदीप कुवर, राज देशमुख, जयसिंग राजपूत, राजू चौधरी, राजेंद्र चौधरी, शिरीष पाटील, संजय आसापुरे, रवि पाटील तसेच महिला आघाडीच्या स्वाती पाटील, सखुबाई पारधी, कल्पना कोळी व भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.