हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर शहर पोलीसांची धडाकेबाज कामगिरी,नवीन बांधकामातून इलेक्ट्रिक वायर चोरी करणारे 2 संशयीत जेरबंद

शिरपूर (प्रतिनिधी) शहरातील वरझडी रोड परिसरात सुरू असलेल्या नवीन घराच्या बांधकामातून इलेक्ट्रिक वायर चोरी करणाऱ्या दोन तरुणांना शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी.पथकाने शिताफीने ताब्यात घेतले.संशयीतांकडून एकूण १ लाख ५ हजार ७५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ या दरम्यान अज्ञात चोरट्याने वरझडी रोडवरील पाणी फिल्टर प्लांटच्या मागील ले-आऊट क्र. ३१, प्लॉट क्र. ३० येथे सुरू असलेल्या नवीन घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील सुमारे ५५ हजार ७५ रुपये किंमतीचे आरआर केबल कंपनीचे १७ बॉक्स (हिरवा, पिवळा, काळा, लाल व निळा रंग) तसेच फिटिंग केलेली वायर चोरी करून नेल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता .गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाने वेगाने तपासचक्रे फिरवत तालुक्यातील कळमसरे येथील अरुणावती नदी पुलाजवळ दोन इसम काळ्या रंगाच्या स्प्लेंडर मोटारसायकल (क्र. एमएच १८ सीसी ५२२०) वर गोणीत व खोक्यात संशयास्पद वस्तू घेऊन जाताना आढळले. त्यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी आपली नावे रोहित दगडू कोळी (वय १९, रा. अजंदे) व बबलू ऊर्फ आदित्य जामसिंग पावरा (वय १९, रा. पारशीपाडा, बरहाडी) अशी सांगितली.
त्यांच्या ताब्यातील गोणी व खोक्यात इलेक्ट्रिक वायर असल्याचे आढळले. अधिक चौकशीअंती त्यांनी सदर वायर पाणी फिल्टर प्लांटच्या मागील बांधकामातून संगनमताने चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी ५५,०७५ रुपये किंमतीची वायर व ५० हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण १,०५,०७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना ११ फेब्रुवारी २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र आखडमल करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी तसेच डी.बी. पथकातील रविंद्र आखडमल, विनोद आखडमल, गोविंद कोळी, मंटू साळुंके, प्रशांत पवार, मनोज महाजन, योगेश दाभाडे, मनोज दाभाडे, सचिन वाघ, आरीफ तडवी व सोमा ठाकरे यांनी केली.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!