हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

८ लाखांची लाच स्वीकारताना उपअभियंता रंगेहाथ अटकेत

धुळे/नंदुरबार : विद्युत ठेकेदाराला अदा करण्यात आलेल्या बिलाच्या मोबदल्यात साडेआठ लाख रुपयांची लाच मागून तडजोडीअंती आठ लाख रुपये स्वीकारताना नंदुरबार सार्वजनिक बांधकाम विभागातील विद्युत उपविभागाचे उपअभियंता नितीन इंगळे यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी (९) सायंकाळी धुळ्यातील सा.बां. विभागाच्या कार्यालयात रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार हे दोंडाईचा येथील शासकीय विद्युत ठेकेदार असून, नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील २८ गावे व पाड्यांमध्ये एलईडी सोलर स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम त्यांना मंजूर झाले होते. या कामासाठी जीएसटी वगळता २ कोटी ३७ लाख २९ हजार ३५६ रुपयांची निविदा मंजूर झाली होती. मार्च २०२५ मध्ये ४१ लाखांचे बिल निघाल्यानंतर इंगळे यांनी लाच स्वीकारल्याचे तसेच उर्वरित रक्कम पुढील बिलात देण्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
डिसेंबर २०२५ मध्ये दोन कोटी दोन लाख पाच हजार ५२५ रुपये बिलापोटी खात्यात जमा झाल्यानंतर पुन्हा साडेआठ लाख रुपयांची लाच मागण्यात आली. याप्रकरणी तक्रारदाराने धुळे एसीबीकडे धाव घेतल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयित इंगळे यांनी आठ लाख रुपयांची लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली.                                            धुळे एसीबीचे डॅशिंग पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृवात पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलिस निरीक्षक पद्मावती कलाल, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, संतोष पावरा, प्रवीण मोरे, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेशमा परदेशी, सुधीर मोरे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!