हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पत्नीच्या हत्येप्रकरणी फरार पतीला शिरपूर तालुका पोलिसांनी केली अटक

शिरपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी फरार झालेल्या आरोपीला शिरपूर तालुका पोलिसांनी गुप्त बातमीच्या आधारे अटक केली. पमा झिंगाड्या पवार (रा. प्रधानदेवी, ता. शिरपूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदरची घटना ३० जानेवारी २०२६ रोजी रात्री आठ ते नऊच्या सुमारास संशयिताने पत्नीला घराजवळील नाल्यात मारहाण केली. या प्रकरणी जखमी महिलेचा भाऊ आशाराम भायला सेनानी यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता (CCTNS गु.र. नं. २१/२०२६).गुन्ह्यानंतर संशयीत फरार झाला होता. पोलिसांचा शोध चुकवण्यासाठी त्याने मोबाईल बंद ठेवल्याने तपासात अडथळे येत होते. दरम्यान, ९ फेब्रुवारी रोजी संशयीत कपडे व साहित्य घेण्यासाठी प्रधानदेवी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे व गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सकाळी साडेअकराच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले.पोलिस चौकशीत त्याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने तिला लाकडी दांडक्याने डोक्यावर व हातापायांवर मारहाण केल्याची कबुली दिली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे,पीएसआय मनोज कचरे,सुनिल वसावे,मिलींद पवार,पोहेकॉ संतोष पाटील, संदिप ठाकरे, पोकॉ भुषण पाटील,योगेश मोरे, संजय भोई, सुनिल पवार,स्वप्निल बांगर,विजय ढिवरे, गुरदास बडगुजर,मनोज नेरकर,कृष्णा पावरा,चापोहेकॉ अल्ताफ मिर्झा, गिरधर पाटील अशांनी केली असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!