हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

मांडळ शिवारात रो-हाऊस फोडून चोरट्यांनी दागिने व ४० हजारांची रोकड केली लंपास

शिरपूर शहरालगत मांडळ शिवारातील  ऋषभनाथ नगरमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या–चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुजित भरतसिंग राजपूत (वय ४१, नोकरी, रा. प्लॉट नं. १७-ए, ऋषभनाथ नगर, मांडळ शिवार, शिरपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.४५ वाजता ते कुटुंबासह दशविधीक्रिया कार्यक्रमासाठी पळासनेर येथे गेले होते. घराच्या वरच्या व खालच्या खोल्यांचे दरवाजे कुलूप लावून बंद केले होते.दरम्यान ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास शेजाऱ्यांनी फोन करून घराचे कुलूप व कडी-कोंडा तुटलेला असल्याची माहिती दिली. त्यानंतर राजपूत कुटुंब सकाळी साडेआठच्या सुमारास घरी आले असता मुख्य दरवाज्याचा कडी-कोंडा तोडलेला आढळून आला. घरात पाहणी केली असता वरच्या मजल्यावरील बेडरूममधील कपाटाच्या लॉकरचे कुलूप फोडलेले असून घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.कपाटातून सुमारे ६९ हजार ९४० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चांदीचे साहित्य तसेच ४० हजार रुपये रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. ५ फेब्रुवारी सायंकाळी ७.४५ ते ६ फेब्रुवारी सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप व कडी-कोंडा तोडून लबाडीच्या इराद्याने घरात प्रवेश करून ही चोरी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास पोहेकॉ कुंदन पवार करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!