हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

सात लाखांची कार चोरट्यांनी लंपास; शिरपूरात खळबळ

शिरपूर : शहरातील जानकीरामनगर परिसरात घरासमोर उभी असलेली सुमारे सात लाख रुपये किमतीची कार चोरट्यांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहरातील वाहनचोरीच्या घटनांत वाढ होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
जानकीरामनगर येथील प्लॉट क्रमांक २२ येथे वास्तव्यास असलेले नरेंद्र दत्तात्रय पाटील यांनी आपली कार (क्रमांक एमएच-१८ बीसी-८५५७) नेहमीप्रमाणे घरासमोर अंगणात उभी केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी संधी साधून ही कार चोरून नेली. सकाळी उठल्यानंतर अंगणात कार दिसून न आल्याने पाटील यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यानंतर त्यांनी तात्काळ शिरपूर शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध वाहनचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या कारची किंमत अंदाजे सात लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणाचा तपास पोहेकॉ राजेंद्र रोकडे करीत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासह संशयितांचा शोध सुरू आहे. सलग घडणाऱ्या वाहनचोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी वाहनांच्या सुरक्षेबाबत अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!