हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

आढे येथील आयुर्वेदिक दवाखान्यास तातडीने वैद्यकीय अधिकारी नियुक्त करा-क्षत्रिय शिवराणा संस्थेची मागणी

शिरपूर : तालुक्यातील आढे येथील शासकीय आयुर्वेदिक दवाखान्यात तातडीने वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, अशी ठाम मागणी क्षत्रिय शिवराणा संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिरपूर पंचायत समितीचे आरोग्य विस्ताराधिकारी प्रकाश वाघ यांना निवेदन सादर केले.
आढे येथील आयुर्वेदिक दवाखान्यात यापूर्वी कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदोन्नती झाल्याने मागील दीड महिन्यांपासून हे पद रिक्त आहे. परिणामी, दवाखान्याचे काम सध्या केवळ परिचरांच्या सहकार्याने सुरू असून रुग्णांना अपेक्षित वैद्यकीय सेवा मिळण्यात अडचणी येत आहेत.
आढे गावासह परिसरातील अनेक गावांसाठी हा आयुर्वेदिक दवाखाना अत्यंत महत्त्वाचा असून दररोज मोठ्या प्रमाणावर रुग्ण येथे उपचारासाठी येतात. मात्र, गावात एकही खासगी डॉक्टर उपलब्ध नसल्याने नागरिकांना किरकोळ आजारांसाठीही शिरपूर शहरात जावे लागते. यामुळे वेळ, पैसा व त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा विचार करता, आढे येथील आयुर्वेदिक दवाखान्यात किमान आठवड्यातून तीन दिवस तरी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घेण्यात यावा, अन्यथा पुढील आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
निवेदन सादर करताना क्षत्रिय शिवराणा संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आरोग्य विस्ताराधिकारी प्रकाश वाघ यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!