हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

कोडीद येथे सिकलसेल ॲनिमिया समुदेशन व जनजागृती मोहीम.!

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत राज्यातील २१ आदिवासी बहुल जिल्ह्यांमध्ये दिनांक १५ जानेवारी ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडी अंतर्गत आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीद अंतर्गत दि.न.पाडवी माध्यमिक विद्यालय कोडीद येथे विद्यार्थ्यांची दिनांक २ फेब्रुवारी २०२६ रोजी सिकलसेल तपासणी करण्यात आली.तसेच आज ह्या शाळेत समुपदेशन शिबिर घेण्यात आले ह्यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा ह्यांनी आपल्या पावरा मातृभाषेत “सिकल सेल आणि आदिवासी समाज”, सिकल सेल काय आहे.? अन् कसा होतो.? अन् कसा आटोक्यात आणायचा.? अन् सिकल सेल रुग्णांसाठी शासकीय योजना ह्यावर सखोल समुपदेशन व मार्गदर्शन केले व प्राथमिक आरोग्य केंद्र बोराडीचे आरोग्य सहाय्यक ह्यांनी पण समुदेशन करून मार्गदर्शन केले.सदर मोहिमेतील तपासणी करीता जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सचिन बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी डॉ.राकेश पावरा, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत सोनवणे, जिल्हा सिकल सेल समन्वयक विलास वारुडे, तालुका सिकल सेल समन्वयक ऋषीराज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.हिरा पावरा यांच्या अधिपत्याखाली यशस्वीरीत्या पार पडली.
यावेळी आरोग्यवर्धिनी उपकेंद्र कोडीदचे आरोग्य सेवक सागर पावरा, आरोग्य सेविका प्रमिला गिरासे, गटप्रवर्तक ज्योती पावरा, शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एम.पाटील सर शिक्षक-कर्मचारी तसेच सर्व आशा कार्यकर्त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!