शिरपूर : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या एम. फार्मसी द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिरपूर येथील एच. आर. पटेल फार्मसी महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. फार्मास्युटिक्स, क्वालिटी अॅश्युरन्स आणि फार्मास्युटिकल केमिस्ट्री या तिन्ही शाखांमध्ये शतप्रतिशत निकाल लागला असल्याचे प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी सांगितले.
फार्मास्युटिक्स शाखेत अर्सुल सोनाली गोपालराव व कांबळे रोहन खंडू यांनी ९.०७ ग्रेड पॉईंट्स मिळवून महाविद्यालयात संयुक्तपणे प्रथम क्रमांक पटकावला. तोंडे राणी विठ्ठलराव ९.०१ द्वितीय क्रमांक, पाटील निकिता माधव व पाटील युवंतिका रविंद्र ८.९६ यांनी संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला. क्वालिटी ॲश्युरन्स शाखेत पाटील रश्मी राजेंद्र हिने ९.३४ ग्रेड पॉईंट्स मिळवत महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. भिमांक्षी राजेश वाकडे ९.२३ द्वितीय, चौधरी कोमल संजय ९.०८ तृतीय क्रमांक मिळवला. फार्मास्युटिकल केमिस्ट्री शाखेत सुगंधी पायल संदीप हिने ९.०७ ग्रेड पॉईंट्ससह महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. सेन सुचेता विष्णुकांत ९.०१ द्वितीय, राजपूत सलोनी प्रदीपसिंग ९.०० तृतीय क्रमांक पटकावला.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव सौ. रेषा पटेल, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. एस. बी. बारी यांनी अभिनंदन केले.
विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. एस. बी. बारी, डॉ. पी. ओ. पाटील, डॉ. एल. आर. झंवर, डॉ. जी. बी. पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचार्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.