हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बीसीसीआय आयोजित स्पीड क्वीन निवड चाचणीमध्ये निवड

शिरपूर / धुळे : धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनची जलद गोलंदाज कु. हितांक्षी मनिष अग्रवाल हिची बीसीसीआय आयोजित स्पीड क्वीन निवड चाचणीमध्ये “अंतिम 30” मुलींमध्ये स्तुत्य निवड झाली आहे.

संपूर्ण भारतातून या चाचणीत सुमारे 8500 मुलींनी सहभाग घेतला होता. यात हितांक्षी अग्रवाल हिने 101. 00 या प्रचंड ताशीच वेगाने गोलंदाजी करून निवडकर्त्यांना आश्चर्यचकित केले.
मुंबई येथील इस्लाम जिमखाना येथे या 30 मुलींमधून “अंतिम 6” मुलींची निवड होणार असून या 6 मुलींना सरळ इंडियन वुमन प्रिमिअर लीग तसेच इंटरनॅशनल व नॅशनल संघात स्थान देण्यात येणार आहे.विशेष बाब म्हणजे, या अंतिम 30 मुलींमध्ये महाराष्ट्र राज्यातील फक्त 3 मुलींची निवड झाली आहे.या अंतिम निवडीसाठी हितांक्षी अग्रवाल हिस धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल, सल्लागार राजवर्धन कदमबांडे, सर्व पदाधिकारी, जिल्ह्यातील ज्येष्ठ क्रिकेटपटू व क्रिकेट रसिकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील होतकरु व प्रतिभावंत महिला क्रिकेटपटूंना एकत्रित आणून त्यांना वर्षभर मोफत प्रशिक्षण देऊन मानधन सुद्धा देण्यात येईल अशी घोषणा अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी नुकतीच केली होती.

         शिरपूर येथील आर. सी. पटेल महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर  7 डिसेंबर 2025 रोजी जिल्ह्यातील महिला क्रिकेटपटूंसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी भूपेशभाई पटेल यांनी घोषणा केली होती.निवड चाचणीत धुळे, शिरपूर, साक्री, शिंदखेडा,  दोंडाईचा येथील 40 महिला क्रिकेटपटूंनी सहभाग नोंदविला होता. एवढा मोठ्या संख्येने महिला क्रिकेटपटूंनी दिलेला प्रतिसाद हा आजवरचा जिल्ह्यातील उच्चांक ठरला. सहभागी क्रिकेटपटूंकडून फलंदाजी, गोलंदाजी, यष्टीरक्षण व क्षेत्ररक्षण यांचा कसून सराव करून घेण्यात आला.महिला क्रिकेटपटूंचे भविष्य उज्वल असल्याने जास्तीत जास्त महिला क्रिकेटपटूंसाठी धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष भूपेशभाई पटेल व सल्लागार माजी आ. राजवर्धन कदमबांडे हे सातत्याने विविध उपक्रम राबवून क्रिकेटपटूंना अनेक संधी उपलब्ध करून देत आहेत.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!