शिरपूर : बोराडी येथे स्व. तपनभाई पटेल प्रीमियर लीग २०२६ या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन अत्यंत उत्साहपूर्ण व दिमाखदार वातावरणात झाले असून क्रीडा स्पर्धेला जल्लोषात सुरुवात झाली.नवीनच बनविण्यात आलेल्या भव्य मैदानावर खेळाडूंचा जोश, प्रेक्षकांचा जल्लोष आणि क्रीडाभावनेचा संगम पाहायला मिळाला.
स्व. तपनभाई पटेल प्रीमियर लीग २०२६ या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन उद्घाटन धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार काशिराम दादा पावरा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, सांगवी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, बोराडीचे उपसरपंच राहुल रंधे, धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशन सचिव प्रितेश पटेल, न.पा. बांधकाम सभापती वासुदेव देवरे, भालेराव माळी, सांगवी मंडळ भाजपा अध्यक्ष योगेश बादल, कैलास पावरा, मगन महाजन, जयवंत पाडवी, शशांक रंधे, डॉ. भास्कर पाटील, राजेंद्र पाटील, राजू सूर्यवंशी, सातपुडा ग्रामीण परिसरातील गावांचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थानचे पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात आई देवमोगरा माता व स्वर्गीय तपनभाई पटेल यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करून झाली.उद्घाटनपर भाषणात भूपेशभाई पटेल यांनी क्रिकेटसारख्या खेळामुळे तरुणाईमध्ये शारीरिक तंदुरुस्ती बरोबरच नेतृत्वगुण, संयम व संघभावना विकसित होत असल्याचे मत व्यक्त केले. खेळाडूंनी खेळताना शिस्त, प्रामाणिकपणा, संघभावना व खेळ भावना जोपासण्याचे आवाहन खेळाडूंना केले. क्रिकेट खेळाविषयी तरुणांमध्ये नवचैतन्य आणावे व क्रिकेट खेळाला प्राधान्य द्यावे असेही आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
सदर स्पर्धेत ६४ संघांचा सहभाग असून स्पर्धा १० दिवस चालणार आहे. मान्यवरांच्या हस्ते नाणेफेक करून डॉक्टर्स व पोलीस यांच्या प्रदर्शनी उद्घाटन सामन्याने स्पर्धेला रंगतदार सुरुवात झाली असून पहिल्याच सामन्यात खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्व. तपनभाई युवा मंच बोराडी सातपुडा ग्रामीण परिसर अध्यक्ष तथा या क्रीडा स्पर्धांचे आयोजक मनजित पवार यांनी केले. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी या क्रिकेट स्पर्धा खेळाडूवृत्तीने खेळून स्पर्धा यशस्वी करावी असे आवाहन केले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण शर्मा यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती व शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन विशेष परिश्रम घेतल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
स्पर्धेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रवीण शर्मा यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक समिती व शिरपूर तालुका क्रिकेट असोसिएशन विशेष परिश्रम घेतल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.