हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

बोराडी यात्रेत छेडछाडीचा धुमाकूळ; पोलिसांच्या उदासीनतेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

​शिरपूर तालुक्यातील बोराडी:येथील ग्रामदैवतच्या दोन दिवसीय यात्रोत्सव मंगळवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.मात्र पहिल्याच दिवशी सुरक्षेच्या चिंधड्या उडाल्याचे विदारक चित्र पाहायला मिळाले. बोराडी पोलीस बीट कर्मचाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे यात्रेत मुलींच्या छेडछाडीच्या घटनांत मोठी वाढ झाली असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी हजारो भाविकांची गर्दी असताना, सुरक्षेची जबाबदारी असलेल्या बीट अंमलदारांनी आपल्या कर्तव्याकडे पाठ फिरवल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे.                                             मिळालेल्या माहितीनुसार,परिसरात टवाळखोर उच्छाद मांडत असताना पोलीस कर्मचारी मात्र मद्य आणि मटनाच्या पार्ट्या झोडण्यात मग्न होते. पोलिसांच्या या बेजबाबदार वर्तणुकीमुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले असून महिला वर्गात भीतीचे वातावरण आहे.गावातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ग्राम सुरक्षा दलाला प्रोत्साहन देण्याऐवजी, पोलिसांनी उलट त्यांनाच दोषी ठरवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. “अर्थपूर्ण” व्यवहारातून पोलिसांनी गुन्हेगारांना पाठबळ दिले असून प्रामाणिक कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असल्याची चर्चा आता गावात रंगली आहे.                                                                            जिल्हा पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची वेळ आली आहे. कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि मद्य-मटनाच्या पार्ट्यांमध्ये दंग राहणाऱ्या दोषी बीट कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी आग्रही मागणी बोराडी ग्रामस्थांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. बुधवारी यात्रेचा शेवटचा दिवस असून, प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!