हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

गर्दीचा फायदा घेत शिरपूर बसस्थानकात प्रवाशाचे ५० हजार लंपास

शिरपूर शहरात प्रवाशांच्या सुरक्षेचा बोजवारा उडाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून, शिरपूर बसस्थानकात दिवसाढवळ्या खिसेकापूने ५० हजार रुपयांची रोकड पळविल्याची धक्कादायक घटना मंगळवार (दि. २८) रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली.
किशोर फकीरा मोरे (वय ५१, व्यवसाय शेती, रा. कुरखनी, ता. शिरपूर) हे आपल्या मुलाच्या शाळेची फी भरण्यासाठी घेतलेले पैसे परत करण्यासाठी धुळ्याकडे जाण्यास निघाले होते. शिरपूर ते छत्रपती संभाजीनगर जाणारी बस लागल्यानंतर बसमध्ये चढताना प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. याच गोंधळाचा गैरफायदा घेत अज्ञात खिसेकापूने मोरे यांच्या पँटच्या उजव्या खिशातून तब्बल ५० हजार रुपयांची रोकड हातोहात लंपास केली.खिशाजवळ स्पर्श जाणवताच मोरे यांनी आरडाओरड करत बसमधून खाली उतरताच चोरटा गर्दीत मिसळून पसार झाला.बसस्थानकात सीसीटीव्ही व पोलीस बंदोबस्त असूनही अशी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.खिसेकापूंचे टोळके सक्रिय झाले असून सामान्य प्रवाशांच्या पैशांवर डल्ला मारला जात असल्याचे चित्र आहे.
या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन सोनवणे करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!