हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिंदखेड्यात न्यायालय परिसरात ‘छोटा हत्ती’च्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

शिंदखेडा शहरातील न्यायालय परिसरातील स्टेशन रस्त्यावर भरधाव मालवाहतूक पिकअप (छोटा हत्ती) वाहनाने पायी जाणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला जोरदार धडक दिल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी २२ जानेवारी रोजी दुपारी घडली या अपघातात कुमारी प्रियंका रावसाहेब कोळी वय २१, रा. भडणे, ता. शिंदखेडा असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या घटनेने शिंदखेडा शहरासह भडणे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, प्रियंका ही एस.एस.व्ही.पी.एस. महाविद्यालयात प्रथम वर्ष विज्ञान शाखेत शिक्षण घेत होती. ती दररोज भडणे येथून शिंदखेड्यात ये-जा करत होती. गरीब शेतकरी कुटुंबातील प्रियंका अभ्यासात हुशार म्हणून ओळखली जात होती.गुरुवारी महाविद्यालयातून घरी परतताना न्यायालय परिसरात फिल्टर पाण्याचे जार वाहून नेणाऱ्या मालवाहतूक वाहनाने तिला धडक दिली. धडकेनंतर वाहन रस्त्यावर पलटी झाल्याचे सांगण्यात येते.अपघातात प्रियंकाच्या डोक्याला तसेच हात-पायांना गंभीर दुखापत झाली.
अपघातानंतर नागरिकांनी तातडीने तिला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी तिला धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.दरम्यान, संबंधित वाहनचालक राहुल पाटील (रा. वरुळ, ता. शिंदखेडा) हा मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!