हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर येथे केसरी कुस्ती स्पर्धा-2026 चे 31 जानेवारी रोजी आयोजन

शिरपूर : केसरी नंदन बहूउद्देशिय संस्था शिरपूर यांच्या विद्यमाने सोनवणे वकील यांच्या बंगल्या समोरील पित्रेश्वर रिक्षा स्टॉप गरबा मैदानावर दि. ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता शिरपूर येथे तिसऱ्यांदा शिरपूर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शिरपूर तालुका व शहरात कुस्ती क्षेत्रात नावलौकिक वाढेल, कुस्तीच्या प्रचार व प्रचारासाठी तसेच स्थानिक कुस्तीपटूंना प्रोत्साहन मिळेल यासाठी या उद्देशाने शिरपूर केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सदर कुस्ती स्पर्धा वयोगट व वजन गटांनुसार होतील. 12 वर्ष आतील, 14 वर्षातील 17 वर्ष आतील मुले व ओपन केसरी वजन गटाच्या स्पर्धा होतील. वजन गटाच्या कुस्त्या मातीवर होणार आहेत.
शिरपूर, शिंदखेडा, साक्री निजामपूर व धुळे जिल्हा ग्रामीण या ठिकाणाहून कुस्तीगीर सहभाग होणार आहेत. शिरपूर केसरी साठी कुस्तीपटूंना सुवर्णसंधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
केसरी नंदन बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने शिरपूर केसरी कुस्ती स्पर्धेचे उदघाटन आमदार काशिराम दादा पावरा यांच्या हस्ते तसेच नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल, उपनगराध्यक्ष संगीता देवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार महेंद्र माळी, गटविकास अधिकारी प्रदीप पवार, तालुका कृषी अधिकारी संजय पवार, नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, धुळे जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष दिलीप लोहार, तालीम संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सैंदाणे, शिरपूर तालुका तालीम संघ अध्यक्ष दीपक माळी तसेच नवनियुक्त नगरसेवक व नगरसेविका उपस्थित राहणार आहेत.
पहेलवान युवराज महाजन, दिपक धनगर, सोनू कोळी, मनीष महिरे, दिनेश सारे, भावेश कोळी, कार्तिक कुवर यांनी शिरपूर केसरी स्पर्धेचे आयोजन केले आहे. यावेळी पंच पहेलवान सुभाष निकुंभे, पप्पू माळी, गोपी लिडिया म्हणून काम पाहतील.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!