शिरपूर : शिंदखेडा तालुक्यातील तामथरे येथे साकारत असलेल्या भव्य व दिव्य ‘श्री राधाकृष्ण प्रेम मंदिरा’च्या उभारणीला भक्तीमय दिशा देण्यासाठी दि. २४ जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी शिरपूर येथे मंदिर बांधकाम समिती व भाविक भक्तांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक सायंकाळी ४ वाजता शहरातील स्व. इंद्रसिंग भाऊसाहेब हॉल, वरझडी रोड, शिरपूर येथे होणार आहे.
ही बैठक श्री राधाकृष्ण प्रेम मंदिर संस्थान, तामथरे यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून, परमपूज्य संत श्री महेंद्रजी महाराज यांच्या पावन अध्यक्षतेखाली बैठक संपन्न होणार आहे. तसेच यावेळी उद्योजक श्री रविशेठ (सुरत, गुजरात) यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
भगवान श्री राधाकृष्णांच्या प्रेम, भक्ती आणि अध्यात्माने ओतप्रोत असलेले हे मंदिर राज्यातील भक्ती, प्रेम व आध्यात्मिक ऊर्जेचे प्रतीक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. मंदिर उभारणीच्या पुढील टप्प्यांचे नियोजन, कार्यपद्धती तसेच भाविकांच्या सूचना व सहभाग यावर बैठकीत सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती संस्थानच्या वतीने देण्यात आली.
या बैठकीसाठी शिरपूर तालुक्यासह परिसरातील सर्व भाविक भक्त, माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच युवा मित्र मंडळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र कार्यात योगदान द्यावे, असे कळकळीचे आवाहन संस्थानकडून करण्यात आले आहे.