हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

श्री श्री रविशंकरजी महाराज यांची आ.पटेल दाम्पत्यानी घेतली सदिच्छा भेट

शिरपूर/मुंबई : अध्यात्म, शांती आणि मानवतेचा संदेश जगभर पोहोचविणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकरजी महाराज यांची मंगळवार (दि. २०) रोजी जुहू (मुंबई) येथे श्री विलेपार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल आणि शिरपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांनी सदिच्छा भेट घेतली.
या वेळी आमदार अमरिशभाई पटेल व सौ. जयश्रीबेन पटेल यांनी श्री श्री रविशंकरजी महाराज यांचे आदरपूर्वक स्वागत केले. महाराजांनीही पटेल दांपत्याशी आत्मीय संवाद साधला. भेटीत ध्यान, योगसाधना, तणावमुक्त जीवनशैली, सामाजिक सलोखा, मानवी मूल्ये तसेच युवकांचे सशक्तीकरण या विषयांवर चर्चा झाली.

आमदार पटेल यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेमार्फत देश-विदेशात सुरू असलेल्या योग-ध्यान, नैतिक शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, ग्रामीण विकास, महिला सक्षमीकरण व युवक प्रशिक्षण अशा उपक्रमांचे कौतुक केले. तसेच श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संस्थेमार्फत मुंबईसह देशभर आणि शिरपूर येथे शैक्षणिक कार्य सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
श्री श्री रविशंकरजी महाराज यांनी पटेल दांपत्याला आशीर्वाद देत सार्वजनिक जीवनात सेवाभाव, प्रामाणिकपणा, संयम व करुणा या मूल्यांचे महत्त्व सांगितले. युवकांनी व्यसनमुक्त व शिस्तबद्ध जीवन जगावे, असेही त्यांनी मार्गदर्शन केले.
दरम्यान, पटेल परिवाराच्या वतीने श्री श्री रविशंकरजी महाराज यांना शिरपूर भेटीचे निमंत्रण देण्यात आले. तसेच शिरपूरमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचा कार्यक्रम घेण्याची विनंती करण्यात आली. यास महाराजांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने शिरपूरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!