हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

धुळ्यात तीन अधिकारी लाच घेतांना रंगेहात अटकेत,जिल्ह्यात खळबळ

धुळे : औद्योगिक प्रयोजनासाठी शेतजमीन मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती ३० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारताना नगररचना विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन अधिकाऱ्यांना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (ता. २१) सायंकाळी रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये धुळे नगररचना विभागातील सहाय्यक नगर रचनाकार कल्पेश धनलाल चौरे, सहाय्यक आरेखक किशोर भटा भोई तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक दिपक आनंदा हटकर यांचा समावेश आहे. हे तिघेही वर्ग दोन व वर्ग तीनचे अधिकारी असल्याने प्रशासकीय वर्तुळात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
तक्रारदाराने औद्योगिक प्रयोजनासाठी दहा हजार चौरस मीटर शेतजमीन मंजूर करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. त्यासोबत ऑफलाईन कागदपत्रेही जमा करण्यात आली होती. या प्रकरणात बिनशेती आदेश देण्यासाठी महसूल सहाय्यक आनंदा हटकर यांनी २० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर १० हजार रुपये देण्याचे ठरले.दरम्यान, नगररचना विभागातील सहाय्यक रचनाकार कल्पेश चौरे व सहाय्यक आरेखक किशोर भोई यांनी मंजुरीसाठी ५० हजार रुपयांची मागणी केली. मात्र तडजोडीनंतर ३० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. याबाबत तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केली.पडताळणीनंतर एसीबीने बुधवारी (ता. २१) सायंकाळी सापळा रचला. कल्पेश चौरे याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर किशोर भोई व आनंदा हटकर यांनाही अटक करण्यात आली.
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे व त्यांच्या पथकाने केली. पुढील तपास सुरू असून संबंधितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!