हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

सावेर फाटाजवळ कार व दुचाकीचा भीषण अपघात, निमझरी येथील दाम्पत्याचा मृत्यू

शिरपूर-चोपडा रस्त्यावर तालुक्यातील सावेर फाटा जवळ पेट्रोल पंपासमोर 20 जानेवारी रोजी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दाम्पत्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.जयदेव गोकूळ गुजर (वय ४८ व प्रतिभा जयदेव गुजर वय 40 रा.निमझरी ता.शिरपूर जि. धुळे असे अपघातात मयत दाम्पत्याचे नाव आहे.
तालुक्यातील निमझरी येथील जयदेव गुजर हा एमएच -18BB-3157 क्रमांकाच्या शाईन दुचाकीने सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शिरपूर चोपडा रस्त्याने शिरपूरकडे जात असतांना शिरपूर तालुक्यातील सावेर येथील जय पेट्रोलियम पंपाजवळ शिरपूर कडून चोपड्याकडे जाणारी भरधाव एमएच -19EP-2869 क्रमांकाच्या स्विफ्ट कारने समोरून जोरदार धडक दिली.या अपघातात दुचाकीवस्वार जयदेव गुजर व त्याची पत्नी असे दोघेही गंभीर जखमी झाले.तर स्विफ्ट कारमध्ये पती, पत्नी व एक चिमुकली होती.मात्र वेळी एअरबॅग उघडल्याने सुदैवाने त्यांना कुठलीही हानी झालेली नाही.
अपघाताची माहीती मिळताच आनिल राजपूत यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत जखमी पती-पत्नीला उपचारसाठी तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.मात्र जयदेव गुजर यास डॉक्टरांनी मयत घोषित केले तर महिलेवर प्राथमिक उपचार करून तात्काळ धुळे येथे रेफर केले.मात्र उपचार सुरू असताना प्रतिभा गुजर या 40 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी हेमंत पाटील यांनी पथकासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी थाळनेर पोलीसांत नोंद करण्यात आली आहे.
दुर्दैवी घटने मुळे निमझरी गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!