हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

महिला क्रिकेटपटूंसाठी 23 जानेवारी रोजी शिरपूर येथे भव्य निवड चाचणी

शिरपूर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, पुणे यांच्या वतीने दि. 28 जानेवारीपासून महिला खुल्या गटासाठी राज्यस्तरीय आमंत्रित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत धुळे जिल्हा महिला क्रिकेट संघ सहभागी होणार असून, संघ निवडीसाठी शिरपूर येथे महिला क्रिकेटपटूंसाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
          धुळे जिल्हा महिला संघासाठीची ही निवड चाचणी दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता शिरपूर येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचे मैदान, करवंद नाका येथे पार पडणार आहे.या निवड चाचणीत सहभागी होण्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नसून, जिल्ह्यातील अनुभवी तसेच नवोदित महिला क्रिकेटपटूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
        निवड चाचणीत सहभागी होणाऱ्या महिला क्रिकेटपटूंनी पूर्व नोंदणी करणे आवश्यक असून, त्यासाठी त्यांनी धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे कार्यालय, गरुड शॉपिंग कॉम्प्लेक्स, कमलाबाई गर्ल्स हायस्कूलसमोर, धुळे येथे आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. नोंदणीवेळी आवश्यक कागदपत्र, ओळखपत्र व क्रिकेटशी संबंधित माहिती सोबत ठेवावी, असेही आयोजकांनी सूचित केले आहे.
या निवड चाचणीतून निवड झालेल्या महिला क्रिकेटपटूंचा धुळे जिल्हा महिला संघ तयार करण्यात येणार असून, हा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित महिला खुल्या गटाच्या आमंत्रित स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील महिला क्रिकेटच्या विकासासाठी ही निवड चाचणी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
        धुळे जिल्ह्यात महिला क्रिकेटला अधिक चालना मिळावी, तसेच ग्रामीण व शहरी भागातील गुणवंत खेळाडूंना योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने ही निवड चाचणी आयोजित करण्यात आली आहे.
धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि सल्लागार तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला क्रिकेटपटूंनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
            महिला क्रिकेटपटूंनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करावे आणि जिल्हा संघात स्थान मिळवावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.
टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!