हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर फाट्यावरून ‘हायवा'(टिपर) चोरीला;एकच खळबळ

शिरपूर तालुक्यातील आमोदा येथील रहिवासी कुलदीप गजेंद्रसिंग राजपूत यांच्या मालकीचा सुमारे लाखो रुपये किमतीचा हायवा (टिपर) अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना १८ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली असून,एकच खळबळ उडाली आहे.            मिळालेल्या माहितीनुसार, कुलदीप राजपूत यांच्या मालकीचा ‘टाटा’ कंपनीचा हायवा (टिपर)(क्र. MH-18 BZ-2706) नेहमीप्रमाणे शिरपूर फाटा येथील ‘भारत सर्व्हिस सेंटर’च्या परिसरात सुरक्षिततेच्या कारणास्तव उभा करण्यात आला होता. मात्र, १७ जानेवारीच्या रात्री ते १८ जानेवारीच्या पहाटेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधून हे अवजड वाहन लंपास केले.१८ जानेवारी रोजी सकाळी वाहन चालक आणि संबंधित कर्मचारी सर्व्हिस सेंटरवर पोहोचले असता, ठरलेल्या ठिकाणी हायवा दिसून आला नाही. आजूबाजूला शोध घेऊनही वाहन मिळून न आल्याने अखेर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती तत्काळ शिरपूर शहर पोलिसांना देण्यात आली.महामार्गालगत असलेल्या परिसरातून एवढे मोठे वाहन चोरीला गेल्याने खळबळ माजली आहे. पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून, चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील आणि हायवेवरील विविध टोलनाक्यांवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची तपासणी सुरू केली आहे. तसेच महामार्गावरील वाहनांच्या येण्या-जाण्याच्या नोंदीही तपासल्या जात आहेत. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास शिरपूर पोलीस करत आहेत.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!