हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

ITBP मध्ये शिरपूरच्या तीन युवकांची निवड,कर्मवीर सैनिकी पूर्व भरती प्रशिक्षण केंद्राचे ययश

शिरपूर : किसान विद्या प्रसारक संस्था, शिरपूर संचलित कर्मवीर सैनिकी पूर्व भरती प्रशिक्षण केंद्राने स्थापनेनंतर अल्पावधीतच उल्लेखनीय यश संपादन केले आहे. केंद्रातील तीन प्रशिक्षणार्थी युवकांची नुकतीच SSC GDदलांतर्गत ITBP (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) मध्ये कॉन्स्टेबल पदी निवड झाली असून, या यशामुळे शिरपूर परिसराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या केंद्रातील विशाल देवबा माळी, चेतन आत्माराम जाधव आणि सागर सुकलाल निकवाडे या तीन युवकांनी अत्यंत कठीण शारीरिक व लेखी परीक्षा यशस्वीरीत्या पार करत भारतीय सीमा सुरक्षा दलात आपले स्थान निश्चित केले आहे. या यशस्वी जवानांचा तसेच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या पालकांचा संस्थेच्या आवारात जंगी सत्कार सोहळा पार पडला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे यांच्या हस्ते नवनियुक्त जवानांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. तुषार रंधे यांनी ग्रामीण भागातील तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी या केंद्राच्या माध्यमातून उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचा आनंद व्यक्त केला. यशस्वी उमेदवारांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे शिस्तबद्ध प्रशिक्षण, नियमित सराव तसेच प्रशिक्षक सागर कोळी व विजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाला दिले. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव निशांत रंधे, कोषाध्यक्षा आशाताई रंधे, संचालक मंडळातील सदस्य, प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, समन्वयक सागर वाघ तसेच क्रीडा सल्लागार डॉ. लिंबाजी प्रताळे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी यशस्वी जवानांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!