राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांनी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक ताकद पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित केली आहे. नगरपालिकांमधील घवघवीत यशानंतर महापालिका निवडणुकांमध्येही भाजपने दमदार कामगिरी करत “भाजप हा राज्यातील क्रमांक एक पक्ष” असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे.
या विजयाच्या आनंदात शिरपूर येथे आमदार कार्यालयात भव्य विजयोत्सव साजरा करण्यात आला. माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, शिरपूर ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल व थाळनेर मंडळ अध्यक्ष विरूपालसिंग राजपूत यांच्या नियोजनातून विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

भाजपच्या या यशाबद्दल आमदार कार्यालयासह शहरातील पाच कंदील परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. या वेळी आमदार काशिराम पावरा यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “हा विजय भाजपच्या विकासाभिमुख धोरणांचा, कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा आणि जनतेच्या विश्वासाचा कौल आहे. पुढील काळातही जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरण्याचे काम भाजप प्रामाणिकपणे करेल.”
या प्रसंगी नगरसेवक श्यामकांत येशी, वासुदेव देवरे, पिंटू माळी, भालेराव माळी, राज सिसोदिया, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुरेंद्र राजपूत, भाजयुमो अध्यक्ष संदीप कुवर, भाजपा तालुका सरचिटणीस योगेंद्रसिंग सिसोदिया, जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष जयसिंग राणा, शहर सरचिटणीस नरेंद्र पाटील, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष संदीप माळी, ओबीसी मोर्चाचे राजेंद्र चौधरी, निलेश पाटील, राजू चौधरी, विजय गिरासे, सुनील राजपूत, मनोज माळी, निलेश देशमुख यांच्यासह असंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपच्या या विजयोत्सवामुळे शिरपूर परिसरात उत्साहाचे वातावरण असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात भाजप अधिक ताकदीने पुढे जाणार असल्याचे संकेत या निमित्ताने मिळत आहेत