हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

धुळ्यात मुख्याध्यापिकेला लाच घेताना रंगेहाथ अटक

धुळे : वेतन बिल काढून देणे व थकित रकमेची मंजुरी देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी धुळ्यातील एका नामांकित विद्यालयाच्या मुख्याध्यापिकेविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. २ हजार ३८० रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापिका रंगेहाथ पकडली गेल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
स्व.सुदाम पिंगळे मेमोरियल ट्रस्ट, धुळे संचलित श्रीमती शांताबाई पिंगळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साक्री रोड येथील मुख्याध्यापिका श्रीमती भारती गिरीष जोशी अशी संशयीत मुख्याध्यापिकेचे नाव आहे.
तक्रारदार या विद्यालयात यापूर्वी ग्रंथपाल पदावर कार्यरत होत्या.सेवेत २४ वर्षे पूर्ण करूनही पदोन्नतीस विलंब, वेतन फरक व नियमित पगाराची थकबाकी अद्याप न मिळाल्याने त्यांनी संशयीत मुख्याध्यापिके कडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मात्र वेतन बिल काढून देण्यासाठी व थकबाकी मंजूर करण्यासाठी २ हजार ४०० रुपयांची लाचेची मागणी केली.याबाबत तक्रारदाराने १३ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,धुळे येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा करून १६ जानेवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सापळा रचण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका भारती जोशी यांनी २ हजार ३८० रुपये स्वीकारताच एसीबी पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल करीत आहे.
सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुतपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे,पोहेकॉ राजन कदम, मुकेश अहिरे,प्रविन मोरे संतोष पावरा,सुधीर मोरे, पोकॉ मकरंद पाटील,प्रवीण पाटील,प्रशांत बागुल,सागर शिर्के,प्रितेश चौधरी,जगदीश बडगुजर,महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा परदेशी यांच्या पथकाने केली आहे

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!