हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

थाळनेर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलिसांना २ दिवसांची पोलीस कोठडी

शिरपूर : शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस ठाण्यातील चार पोलीस अंमलदारांवर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केल्यानंतर मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी त्यांना शिरपूर न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने चौघांनाही २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीस अटक टाळून सहकार्य करण्याच्या बदल्यात लाच मागितल्याप्रकरणी थाळनेर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार मुकेश पावरा यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दि. १२ जानेवारी रोजी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले होते.
या प्रकरणाच्या चौकशीनंतर थाळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भूषण रामोळे तसेच किरण सोनवणे, मुकेश पावरा आणि धनराज मालचे यांच्याविरोधात रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर उर्वरित तिघे पोलीस कर्मचारी फरार झाले होते. मात्र, न्यायालयात स्वतःहून हजर झाल्यानंतर चौघांनाही न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी लाच प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित चारही पोलीस अंमलदारांना निलंबित केले आहे. तसेच, ढिसाळ पर्यवेक्षण व कर्मचाऱ्यांवर योग्य नियंत्रण न ठेवल्याचा ठपका ठेवत थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांनाही निलंबित करण्यात आले आहे.या कारवाईमुळे तालुक्यासह संपूर्ण जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!