हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

लाच प्रकरण भोवले;थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकाऱ्यासह 4 अंमलदार निलंबित

एपीआय शत्रुघ्न पाटील यांची उचलबांगडी तर हेमंत पाटील प्रभारी

 

शिरपूर :- धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने थाळनेर पोलीस ठाण्याचे अंमलदारांनी तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्याप्रकरणी कारवाई केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने कठोर भूमिका घेत थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच लाच स्वीकारणाऱ्या चार पोलीस अंमलदारांना निलंबित केले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
काल दि.१२ जानेवारी रोजी अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना थाळनेर पोलीस ठाण्यातील पोहेकॉ भूषण रामोळे,पोकॉ धनराज मालचे,मुकेश पावरा, किरण सोनवणे या 4 कर्मचाऱ्यांवर धुळे एसीबीने गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी तात्काळ कारवाई करत थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक शत्रुघ्न पाटील यांना ‘स्लॅक सुपरव्हिजन’ व कर्मचाऱ्यांवर योग्य नियंत्रण न ठेवल्याचा ठपका ठेवून निलंबित केले.त्याचबरोबर लाच मागितल्याचा व स्वीकारल्याचा आरोप असलेल्या चारही पोलीस अंमलदारांना तडकाफडकी निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.                                      शिस्तीचे खाते म्हणून ओळख असलेल्या पोलीस दलात एकाचवेळी चार कर्मचाऱ्यांवर लाच प्रकरणात कारवाई झाल्याने पोलीस दलावर टीकेची झोड उठली होती.निलंबित प्रभारी अधिकारी शत्रुघ्न पाटील यांची मुख्यालयात नियुक्ती करण्यात आली असून निलंबन काळात त्यांनी गृह उपअधीक्षकांकडे दररोज उपस्थिती द्यावी तसेच दर शुक्रवारी परेडच्या दिवशी उपस्थित राहावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, थाळनेर पोलीस ठाण्याच्या प्रभारी पदाची जबाबदारी शिरपूर येथील पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!