शिरपूर :- राज्य उत्पादन शुल्क शिरपूर विभागाने साक्री तालुक्यातील शेलबारी घाट परिसरात मोठी कारवाई करत बनावट व विदेशी दारूची अवैध वाहतूक उघडकीस आणली असून या कारवाईत सुमारे 61 लाख 3 हजार 658 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूर बिट क्रमांक 1 यांनी साक्री तालुक्यातील शेलबारी शिवारात सापळा रचण्यात आला होता. यावेळी MH-14HG-9992 आणि GJ-26-AE-2869 तसेच किया कंपनीचे एक वाहन MH-46CH- 0929 क्रमांकाची वाहने संशयास्पदरीत्या येताना आढळले.मात्र पथकास पाहून वाहन चालकांनी अंधाराचा फायदा घेत वाहन सोडून पळ काढला सदर वाहनाची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात बनावट व विदेशी मद्य साठा आढळून आला. त्यात रॉयल स्टॅग, रॉयल स्पेशल, ब्लेंडर प्राईड, मॅजिक मुमेंट यासह विविध ब्रँडची दारू, बनावट लेबले व साहित्य असा 14 लाख 3 हजार 658 रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आल्याने 47 लाख रुपये किमतीचे तीन वाहने असा 61 लाख 3 हजार 658 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी संबंधित वाहनाचे अज्ञात चालक व अज्ञात मालकांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक, दुय्यम निरीक्षक व कर्मचाऱ्यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाने आतापर्यंत बनावट कारखाने,अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करून करोडो,लाखोंचा मुद्देमाल ताब्यात घेतल्याने त्यांचे अभिनंदन.मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईत वाहन चालक,मूळ मालक,बनावट कारखाने चालक नेहमीच फरार होतात ते सापडतच नाही.मुख्य कारण काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थितीत केले जात असून याबाबत किती कारवाया करण्यात आल्या व किती संशयीतांवर गुन्हे दाखल करून कितीना न्यायालयाने सजा सुनावली यांची आकडेवारी समोर येणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.