हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

चंदन आबा फाऊंडेशनच्या वतीने पोलिस व पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर

 

शिरपूर:- शहरातील चंदन आबा फाऊंडेशनच्या वतीने दैनिक राष्ट्र उदयच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त पोलिस व पत्रकारांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता शहर पोलीस ठाण्यात करण्यात आले.

या शिबिरात हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ.पितांबर दिघोरे,डॉ.अमित गुजराथी व डॉ. विनोद पावरा यांनी पोलिस अधिकारी,अंमलदार तसेच पत्रकारांची आरोग्य तपासणी करून योग्य सल्ला व मार्गदर्शन केले. धावपळीच्या व तणावपूर्ण कामामुळे उद्भवणाऱ्या आजारांविषयी जनजागृती करत नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शत्रुघ्न पाटील, पीएसआय संदीप दरवडे, सुरेश सोनवणे तसेच दैनिक राष्ट्र उदयचे संपादक रत्नदीप सिसोदिया यांच्यासह अनेक पत्रकार, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.या उपक्रमाबद्दल उपस्थितांनी चंदन आबा फाऊंडेशन व दैनिक राष्ट्र उदयचे कौतुक केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!