हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

पळासनेर येथे एबी रोडवर पडलेल्या खडीमुळे भीषण अपघात; युवक गंभीर जखमी

शिरपूरहून सेंधवाकडे जात असताना तालुक्यातील पळासनेर गावालगत चारणपाडा परिसरात रस्त्याच्या कडेला पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाल्याची घटना 10 जानेवारी रोजी सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास घडली.या अपघातात वहान्या लकडा कनोजे वय 26, रा. राजमोली, ता. निवाली, जि. बडवानी असे जखमी युवकाचे नाव आहे.                                                                                  मिळालेल्या माहितीनुसार,शिरपूर येथून जातांना वहान्या कनोजे हा युवक पळासनेर येथील यात्रोत्सव पाहून दुचाकीने सेंधवाकडे जात होता. गावाबाहेर चारणपाडा परिसरात मुंबई–आग्रा महामार्गाच्या कडेला अनेक दिवसांपासून पडलेली खडी असल्याने त्याची दुचाकी घसरून डिव्हायडरला आदळली.या अपघातात युवकास गंभीर दुखापत झाली.अपघाताची माहिती मिळताच पत्रकार निलेश दुबेसह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव तालुका पोलीस, महामार्ग पोलीस माहिती दिली.पोलिसांनी घटनास्थळी धाव जखमी युवकास शासकीय रुग्णवाहिकेद्वारे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
विशेष म्हणजे, रस्त्याच्या कडेला पसरलेल्या खडीमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले असतानाही संबंधित यंत्रणांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. ही धोकादायक खडी तात्काळ हटविण्यात यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून होत असून अन्यथा भविष्यात आणखी किती निष्पापांचे जीव धोक्यात येणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!