हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष संगीता देवरे यांच्यासह स्वीकृत नगरसेवकांची निवड

शिरपूर वरवाडे नगरपालिका कार्यालयात लोकनियुक्त नगराध्यक्ष चिंतनभाई अमरीशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 8 जानेवारी रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत नगरसेवक व नगरसेविका पदांची निवड प्रक्रिया पार पडली.                         या सभेत सौ.संगिताताई राजेंद्र देवरे यांची उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल सभागृहात उपस्थित सर्व मान्यवरांनी अभिनंदन केले. तसेच स्वीकृत नगरसेविका म्हणून सौ. अमृताताई मनोज महाजन यांची, तर स्वीकृत नगरसेवक म्हणून माधवराव तुकाराम पाटील आणि प्रशांत बबनराव चौधरी यांची निवड करण्यात आली.या निवड प्रक्रियेदरम्यान सर्व पदांसाठी एकमताने निर्णय घेण्यात आल्याने सभेचे वातावरण उत्साही व सकारात्मक होते. नव्याने निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
या विशेष सभेस माजी नगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत सरोदे, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगरसेवक रोहित रंधे यांच्यासह अनेक विद्यमान नगरसेवक, नगरसेविका तसेच सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!