हेल्मेटशिवाय कार्यालयात येणाऱ्यांवर कारवाई; सरकारी,निमशासकीय व खासगी कर्मचाऱ्यांसह नागरिकांसाठी सक्ती लागू  //  एनएमआयएमएस शिरपूरमध्ये आंतरराष्ट्रीय ग्रंथालय परिसंवाद; कृत्रिम बुद्धिमत्ता व मुक्त ज्ञानप्रवेशावर मंथन  //  . खा. मुकेशभाई पटेल यांना 24 व्या स्मृतीदिनानिमित्त आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात भावपूर्ण अभिवादन  //  स्व. मुकेशभाई पटेल यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या अभिवादन कार्यक्रम; आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलात आयोजन  //  शिरपूरमध्ये फळांच्या गोदामाला भीषण आग; व्यापाऱ्याचा संसार, दुचाकीसह लाखोंचे नुकसान  //  आढे येथे गावठी दारू अड्ड्यांवर राज्य उत्पादन शुल्कची धाड; ८० लिटर दारू, १,०५० लिटर रसायन जप्त  //  अर्थे शिवारात ४४ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या,शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद  //  घरफोडी करणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या; २.२७ लाखांचा मुद्देमाल जप्त,शहर पोलिसांची धडक कारवाई  //  धुळे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा टॅलेंट सर्च दोंडाईच्यात उत्साहात; १६१ खेळाडूंचा सहभाग  //  अनोळखी कॉल रिसिव्ह करताच ९९ हजारांची ऑनलाईन फसवणूक

भोरखेड्यात महाराणा प्रतापसिंह अश्वारूढ पुतळ्याचे भूमिपूजन उत्साहात

शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथे महाराणा प्रताप स्मारक अभियान समिती अंतर्गत वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या उभारणीसाठी भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे भूमिपूजन महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रवीरसिंह नमाणा तसेच उद्योगपती सरकारसाहेब रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराणा प्रतापसिंह यांच्या पराक्रम, स्वाभिमान व राष्ट्रनिष्ठेचा आदर्श पुढील पिढीपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने राजस्थानस्थित महाराणा प्रताप स्मारक अभियान समितीच्या वतीने देशभरात राष्ट्रपुरुषांचे मोफत ५०० पुतळे, १०० स्मारके तसेच १२ ज्योतिर्लिंग परिसरात वास्तुसंग्रहालय व बगीचा स्मारके उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आला आहे.त्या उपक्रमाअंतर्गत तालुक्यातील भोरखेडा येथे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळा उभारण्यात येत आहे.यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणांतून महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्यपूर्ण जीवनकार्याचा गौरव केला.या ऐतिहासिक व प्रेरणादायी सोहळ्यामुळे भोरखेडा परिसरात अभिमान व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
यावेळी व्यासपीठावर महाराणा प्रताप प्रतिष्ठानचे मंगलसिंग राजपूत, सरपंच श्रीमती विठाबाई ठाकरे,पत्रकार रत्नदीपसिंग सिसोदिया,यांच्यासह राजपूत समाजाचे तालुक्यातील सरपंच,पोलीस पाटील, विविध संस्थाचे पदाधिकारी,सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराणा प्रताप स्मारक अभियानाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराणा प्रताप प्रतिष्ठान भोरखेडा तसेच युवा मित्र मंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पिंपरी येथील पोलीस पाटील जयपालसिंग गिरासे यांनी केले. प्रास्ताविक रत्नदीपसिंग सिसोदिया यांनी मांडले, तर आभार प्रदर्शन आयोजक मंगलसिंग पंडितसिंग राजपूत यांनी केले.

टॅग्स:
शेअर
Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Telegram
आमच्याशी जुडा
हे ही वाचा
error: Content is protected !!